Also visit www.atgnews.com
IGNOU च्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
Result 2020: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) च्या विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इग्नूचे अधिकृत संकेतस्थळ वर हे सर्व निकाल अपलोड करण्यात आले आहेत. जे उमेदवार परीक्षेत सामील झाले होते, ते आता इग्नूच्या संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहू शकतील. निकाल थेट लिंकद्वारा देखील पाहता येणार आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही विनासायास आपला निकाल तपासू शकतात आणि डाऊनलोड करू शकतात. IGNOU Results 2020 असा पाहा निकाल - - इग्नूच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. इग्नूच्या संकेतस्थळाचा पत्ता - ignou.ac.in - होम पेजवर निकालाच्या टॅबवर क्लिक करा. - आता नवीन पेज उघडेल. येथे रिझल्ट्स या पर्यायावर जाऊन संबंधित कोर्सवर क्लिक करा. - दिलेल्या जागी आपला रोल नंबर आणि अन्य माहिती भरून लॉग इन करा. - आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल. - निकाल डाऊनलोड करा आणि एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा. तांत्रिक अडचण निकाल जारी झाल्यानंतर इग्नूच्या संकेतस्थळावर तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. संकेतस्थळ उघडत नसल्याने हजारो विद्यार्थी आपला निकाल पाहू शकत नाहीएत. विद्यापीठ प्रशासन ही त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न करत आहे. थेट लिंकवरून IGNOU निकाल पाहण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37IXxoa
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments