Also visit www.atgnews.com
NEET 2020 : नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जारी
Question Paper Download: नॅशनल टेस्टिंग एजन्सी () ने मेडिकल एन्ट्रन्स एक्झाम (NEET 2020) परीक्षेत विचारलेले प्रश्न सार्वजनिक केले आहेत. एनटीएने नीट २०२० च्या सर्व प्रश्नपत्रिका जारी केल्या आहेत. या त्या सर्व भाषांच्या प्रश्नपत्रिका आहेत, ज्या भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन (ntaneet.nic.in) इंग्रजी, हिंदी किंवा आपल्या सोयीनुसार अन्य भाषेतील प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येतील. यासाठी कुठलाही लॉगइन आयडी किंवा अन्य तपशील देण्याची आवश्यकता नाही. प्रश्पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक या वृत्तात देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करून संबंधित भाषेतील प्रश्नपत्रिकेच्या लिंकवर क्लिक करा. स्क्रीनवर प्रश्नपत्रिका पीडीएफ फॉरमॅटमध्ये उघडेल. ती डाऊनलोड करा. तयारीसाठी होईल मदत या प्रश्नपत्रिका विशेष करून त्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहेत, जे नीटची तयारी करत आहेत. पूर्ण प्रश्नपत्रिका पाहिल्यास परीक्षेचा पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. सोबत यावर्षी विचारलेल्या प्रश्नांचा सरावही होईल. कधी येणार निकाल? नीट २०२० च्या प्रोव्हिजनल आन्सर की वर हरकती मागवण्यात आल्या आहेत. आता या परीक्षेची अंतिम आन्सर की जारी होईल आणि त्यानंतर निकाल जारी होईल. एनटीए ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीट परीक्षेचा निकाल जारी करण्याची शक्यता आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SkmrRZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments