RRB Exam date 2020: रेल्वे बोर्डाची परीक्षा कधी? जाणून घ्या...

RRB Exam 2020 Date announced: भारतीय रेल्वेतील रिक्त पदांवर भरती करण्यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने (आरआरबी) परीक्षा आयोजित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वेने CEN 03/2019 नोटिफिकेशन द्वारे ३० विविध श्रेणीत भरतीसाठी अर्ज मागवले होते. या अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर १५ ऑक्टोबर २०२० रोजी अॅप्लिकेशन स्टेटस चेक करण्याची लिंक जारी केली होती. आता बोर्डाने मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड श्रेणीतील पदांसाठी भरती परीक्षेचा तारखांची घोषणा केली आहे. जे वेळापत्रक जारी झालं आहे त्यानुसार, आरआरबीद्वारे या भरतीसाठी संगणकीकृत परीक्षेचे (CBT) आयोजन १५ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२० या दरम्यान करण्यात येईल. बोर्डाने सांगितलं की कोविड-१९ सुरक्षेसंदर्भातील नियमावली, आरोग्यविषयक मार्गदर्शन तत्वांचे पालन करत परीक्षा आयोजित केली जाईल. विद्यार्थ्यांना आपले परीक्षा केंद्राचे शहर आणि तारखेची माहिती परीक्षा सुरू होण्याआधी १० दिवस संबंधित आरआरबी वेबसाइटवर पाहता येईल. अॅडमिट कार्ड / ई-कॉल लेटर सीबीटी सुरू होण्याआधी चार दिवस डाऊनलोड करता येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mEVeGQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments