Also visit www.atgnews.com
SSC CGL आणि CHSL 2018 स्कील टेस्ट कधी? आयोगाने सांगितले
CGL आणि CHSL 2018 परीक्षेसाठी स्कील टेस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आयोजित केली जाईल. याबाबत अधिक माहिती अधिकृत स्वरुपात देण्यात आली आहे. साठी स्कील टेस्ट २६ नोव्हेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे , तर CGL 2018 साठी तारखांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. स्टाफ सिलेक्शन कमिशनने नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, 'कोविड-१९ महामारी स्थितीमुळे आणि भरती प्रक्रियेला वेग आणण्याच्या दृष्टीने आयोगाने भारतीयत्वाच्या आधारे स्कील टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.' उमेदवरांच्या सुविधेसाठी SSC आपल्या संकेतस्थळावर स्कील टेस्टमधील प्रक्रियांचा एक डेमो अपलोड करणार आहे. स्कील टेस्ट SSC CHSL आणि CGL या भरती प्रक्रियेतील एक टप्पा आहे. जे उमेदवार टिअर १, टिअर २ आणि टिअर ३ परीक्षा उत्तीर्ण होतात, त्यांना स्कील टेस्टसाठी शॉर्टलिस्ट केले जाते. टिअर ३ परीक्षा २०१९ मध्ये डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या आधारे एकूण ३२,००१ उमेदवार स्कील टेस्टमध्ये सहभागी होणार आहेत. दुसरीकडे, सुमारे ३५ हजार उमेदवार SSC CHSL 2018 स्कील टेस्टमध्ये सहभागी होणार आहेत. CGL २०२० परीक्षा CGL २०२० परीक्षेचे नोटिफिकेशन २१ डिसेंबर रोजी जारी केले जाणार आहे तर परीक्षा २०२१ च्या मे महिन्यात आयोजित केली जाणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी स्कील टेस्टसंदर्भातील नोटिफिकेशन वाचण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36HjhjM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments