Also visit www.atgnews.com
UGC NET 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी
Admit Card Update: विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय पात्रता परीक्षा २०२० (UGC NET 2020) साठी अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नोव्हेंबर २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी नेटच्या अधिकृत संकेतस्थळावर ugcnet.nta.ac.in वर अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची लिंक अॅक्टिव्ह केली आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते, ते आता एनटीए यूजीसी नेटच्या वेबसाइटद्वारे आपलं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक देखील या वृत्तात दिली जात आहे. पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून अगदी सहजपणे तुम्ही अॅडमिट कार्ड मिळवू शकता. कधी होणार परीक्षा? यूजीसी नेटची सामान्यपणे जून महिन्यात होणारी ही परीक्षा आहे, जी यावर्षी नोव्हेंबर मध्ये घेण्यात येत आहे. करोना विषाणू महामारीमुळे अनेकदा स्थगित झाल्यानंतर एनटीएद्वारे या परीक्षेचं आयोजन होत आहे. ही परीक्षा ४,५,११, १२ आणि १३ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात येईल. थेट लिंकवरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला कोणत्या तारखेत अथवा सत्रात उपस्थित व्हायचे आहे, याची संपूर्ण माहिती अॅडमिट कार्डमध्ये देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही अन्य तारीख वा सत्रात तुम्ही परीक्षा देऊ शकणार नाही. UGC NET च्या वेबसाइटवर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oEUjZ1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments