लस आल्याशिवाय उघडणार नाहीत 'या' राज्यातील शाळा

2020: करोना काळात पुन्हा सुरू होण्याची शक्यता तूर्त मावळली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री म्हणाले की कोविड-१९ वरील लस येईपर्यंत दिल्लीतील शाळा बंद राहतील. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले की दिल्लीत सध्या करोना विषाणूच्या साथीची तिसरी लाट आली आहे आणि हा सर्वात धोकादायक टप्पा आहे. सध्या दिल्लीत संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 20 दिवसांपासून कोविड पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि शेकडो लोकही मरण पावले आहेत. मनीष सिसोदिया पुढे म्हणाले की, सध्या कोणतेही आईविडल किंवा पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याचा धोका पत्करणार नाहीत. दिल्लीत शाळा सुरू करण्याची ही योग्य वेळ नाही. पालकांना देखील आपल्या मुलाच्या आयुष्याबाबत कोणतीही जोखीम घ्यायची नाही. म्हणूनच, सध्या आम्हाला शाळा पुन्हा सुरू करणे परवडणार नाही किंवा पालकांना ते करण्याची इच्छा नाही. मार्च २०२० पासून दिल्लीतील सर्व शाळा बंद आहेत. तथापि, केंद्र सरकारने नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतु, संसर्गाचे प्रकार वाढत असताना राज्य सरकारला यापुढे कोणताही धोका पत्करायचा नाही. सिसोदिया यांनी माध्यमांना सांगितले की लस य़ेईपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. दिल्लीत शाळा सुरू होण्यासाठी परिस्थिती अद्याप अनुकूल नाही. सद्यस्थितीत शाळा उघडण्याचा परिणाम घातक ठरू शकतो. सध्याच्या काळात शाळा सुरू करणे मुलांना साथीच्या आजाराकडे ढकलण्यासारखे असेल. सिसोदिया पुढे म्हणाले की, आम्हाला केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. आम्ही संघभावनेने काम करून या महामारीविरोधात लढा देत आहोत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2HDgoGG
via IFTTT

Post a Comment

0 Comments