शाळा उघडल्यानंतर २६२ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह!

Schools Reopening: शाळा उघडाव्यात की उघडू नयेत असा संभ्रम असणाऱ्या सर्व राज्यांसाठी इशारा ठरेल अशी ही बातमी आहे. आंध्र प्रदेशमध्ये शाळा प्रत्यक्ष उघडल्यानंतर तब्बर २६२ विद्यार्थ्यांना आणि १६० शिक्षकांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये २ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रत्यक्ष भरण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून गेल्या तीन दिवसांत २६२ विद्यार्थ्यांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. 'मात्र ही आकडेवारी खबरदारीची नव्हे कारण जितक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहात आहेत, त्या तुलनेत ही आकडेवारी फारच कमी आहे. तहीरी कोविड-१९ सुरक्षेसंदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत,' असे शालेय शिक्षण आयुक्त व्ही. चिन्ना वीरभद्रुदू म्हणाले. बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावली. २६२ विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाली. मात्र, हे प्रमाण ०.१ टक्का इतकं देखील नाही. म्हणूनच ही मुलं शाळा उघडल्यामुळे बाधित झाली असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. प्रत्येक शाळेच्या वर्गात केवळ १५ ते १६ विद्यार्थ्यांनाच बसण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ९.७५ लाख विद्यार्थ्यांनी नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी नोंदणी केली. यापैकी ३.९३ लाख विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती लावली. यातील १.११ लाख शिक्षक होते. १.११ लाख शिक्षकांपैकी १६० करोना पॉझिटिव्ह झाले. विद्यार्थी आणि शिक्षक दोहोंचे आयुष्य आमच्यासाठी मोलाचे आहे. असं वीरभद्रुदु म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l0XGHo
via IFTTT

Post a Comment

0 Comments