कोकण रेल्वेत भरती; कोणकोणत्या जागा रिक्त..जाणून घ्या

कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने रिक्त जागांसाठी भरतील प्रक्रिया सुरू केली आहे. २८ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणकोणत्या जागा रिक्त आहेत, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक व अन्य पात्रता काय आहे ही सर्व माहिती या वृत्तात पुढे देत आहोत. ही भरती टेक्निशिअन ३ आणि इलेक्ट्रिकल या पदांसाठी आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा येथे ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. पदांची माहिती - टेक्निशिअन -३ / इलेक्ट्रिकल पदांची एकूण संख्या - ५८ शैक्षणिक पात्रता - एसएससी / एसएसएलसी, आयटीआय किंवा समकक्ष. वयोमर्यादा - किमान वय १८ ते कमाल वय ३३ वर्षे. निवड प्रक्रिया - संगणकीकृत परीक्षा, कौशल्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज शुल्क - सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये तर अन्य सर्व प्रवर्गांसाठी २५० रुपये आकारण्यात येतील. अर्ज कसा कराल? कोकण रेल्वेचे संकेतस्थळ www.konkanrailway.com वर जा. - येथून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. - आपण ज्या पदासाठी अर्ज करत आहोत त्याची शैक्षणिक व अन्य पात्रता यात आपण बसतो का हे उमेदवारांनी पडताळून पाहावे. - ऑनलाइन शुल्क भरावे् - सबमीट बटणवर क्लिक करावे. - भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून ठेवावे. महत्त्वाच्या तारखा - अर्ज सुरू होण्याची तारीख - २८ ऑक्टोबर २०२० अर्ज करण्याची अंतिम मुदत - २७ नोव्हेंबर २०२० या भरतीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी अर्ज करण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2HQRPpX
via IFTTT

Post a Comment

0 Comments