राज्यात शाळा सुरू; पहिल्या दिवशी विद्यार्थी उपस्थिती अत्यल्प

म. टा. प्रतिनिधी, सांगली / पुणे करोना संसर्गामुळे बंद झालेले शाळांचे दरवाजे तब्बल साडेसात महिन्यांनी सोमवारी पुन्हा उघडले. नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या सांगली जिल्ह्यातील ८० टक्के शाळा सुरू झाल्या. मात्र, पहिल्या दिवशी केवळ १५ टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावली. संसर्ग वाढू नये याची दक्षता घेऊन शाळा नियमित सुरू ठेवल्या जातील, अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी दिली. नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या जिल्ह्यात ७५० शाळा आहेत. या शाळांमध्ये दीड लाख विद्यार्थी आहेत. यापैकी ५० हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचे संमतीपत्र दिले आहे. साडेसात महिन्यांच्या दीर्घ कालखंडानंतर सोमवारी पुन्हा शाळांची घंटा वाजली. जिल्ह्यातील ७५० शाळांपैकी ६०० शाळा सुरू झाल्या. शाळांनी वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे. शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्यात आले. सुरक्षित वावर आणि मास्कचा वापर करत शाळांची सुरुवात झाली. नववी ते बारावीच्या वर्गांमध्ये एकूण ९० हजार विद्यार्थी आहेत. यापैकी १५ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी उपस्थिती लावली. येणाऱ्या आठवडाभरात विद्यार्थीसंख्या वाढेल, असा विश्वास शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले असले तरी, जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाइन क्लास सुरू राहणार आहेत. सांगली जिल्ह्यातील ७५० शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा ६२५९ जणांची करोना चाचणी झाली आहे, त्यातील २२ जण करोना पॉझिटिव्ह आहेत. ऑनलाइन शिक्षणही राहणार सुरू राज्यातील स्थानिक प्रशासनाला या संदर्भात सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुुुसर अनेक शााळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती. शाालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज या संदर्भात स्थानिक प्रशासकीय अधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्याशी संंपर्क साधूूून माहिती घेेतली. एक दिवस आड करून विद्यार्थी शााळे उपस्थित राहणार आहेत. शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गही चालू राहणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. पुण्याच जि.प. च्या शाळा सुरू पुणे जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरु झाल्या असून . नववी ते बारावीपर्यंत जिल्ह्यात २ लाख ३८ हजार ४१ विद्यार्थ्यापैकी पहिल्या दिवशी ९,४३१ विद्यार्थी उपस्थित होते. जिल्ह्यात नववी ते बारावी पर्यंत १२४६ एकूण शाळांपैकी २१८ शाळाचें वर्ग सुरू झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी माहिती दिली. दरम्यान, शाळा सूरु असताना जिल्ह्यतील विद्यार्थ्याला करो नाची लागण झाल्यास त्याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च हा जिल्हा परिषद उचलणार, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील नववी ते बारावी च्या एकूण शिक्षक, शिक्षकेतर १५,८५४ कर्मचाऱ्यांपैकी ६५६५ एवढ्या चाचण्या झाल्या.त्यामध्ये २९ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले अशी माहिती देण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/371RiK7
via IFTTT

Post a Comment

0 Comments