तटरक्षक दल भरती: अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू

Indian Coast Guard Navik (DB) Recruitment 2020: भारतीय तटरक्षक दलाने नाविक भरती प्रक्रियेला आजपासून सुरूवात केली आहे. ०१/२०२१ बॅचसाठी ही भरती होती आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे, ते या तटरक्षक दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. कुक आणि स्टिवर्ड पदांसाठी ही भरती होत आहे. Navik (DB) 01/2021 बॅचसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. साधारणपणे ५० जागा रिक्त आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०२० पासून सुरू होत आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत ७ डिसेंबरपर्यंत आहे. परीक्षेचे अॅडमिट कार्ड १९ डिसेंबर पासून उपलब्ध होणार आहे. परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये असेल. परीक्षेची निश्चित तारीख नंतर इंडियन कोस्ट गार्डच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण (एससी / एसटी उमेदवारांना ५ टक्के सवलत) आणि राज्यांतर्गत किंवा राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही खेळात १ ते ३ पर्यंतचा रँक मिळालेला असावा. कामाचे स्वरुप स्वयंपाकी (कुक) मेनूनुसार शाकाहारी, मांसाहारी पदार्थ तयार करणे. याव्यतिरिक्त अतिरिक्त कामेदेखील दिली जातील. स्टीवर्ड पदाच्या व्यक्तीने वेटरप्रमाणे पदार्थ सर्व्ह करणे, हाऊसकिपींग, वाइन, अन्य वस्तूंची हाताळणी, फंड मेंटेनन्स करणे अपेक्षित आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fMJWy6
via IFTTT

Post a Comment

0 Comments