जेईई मेन जानेवारी २०२१ परीक्षा लांबणीवर पडणार का?

Update: जानेवारी २०२१ च्या जेईई मेन परीक्षेसंदर्भात लाखो विद्यार्थी-पालकांच्या मनात संभ्रम आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी () ने आतापर्यंत या परीक्षेसंदर्भात कोणतेही नोटिफिकेशन जारी केलेलं नाही. विद्यार्थ्यांमध्ये अद्याप या परीक्षेच्या बाबतीत संभ्रमाचं वातावरण आहे. कोविड-१९ विषाणू महामारीमुळे ही परीक्षा रद्द होणार, लांबणीवर पडणार की नेमकं काय होणार याबाबत अनिश्चितता आहे. यासंबंधी एनटीएने कोणतीही अधिकृत सूचना जारी केलेली नाही. मात्र एनटीएच्या सूत्रांचं म्हणणं आहे की परीक्षा रद्द होणार नाही. दुसरीकडे आयआयटी दिल्लीचे निवृत्त फॅकल्टी आणि एनटीएच्या सल्लागारांचं म्हणणं आहे की 'परीक्षा रद्द होणार नाही, मात्र विलंब होऊ शकतो. २०२१ च्या बोर्ड परीक्षांच्या शेड्युलच्या आधारेच जेईई मेनचे शेड्युल जारी होईल. तारखा एकमेकांशी क्लॅश होऊ नये, हे ध्यानात ठेवले जाईल. त्यामुळे जेईई मेन जानेवारी २०२१ परीक्षेत विलंब होऊ शकतो.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KxhKDP
via IFTTT

Post a Comment

0 Comments