मुंबई विद्यापीठाच्या बॅकलॉग परीक्षा ३० नोव्हेंबर पर्यंत

Mumbai : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम आणि द्वितिय वर्षाच्या २०१९-२० च्या (ATKT) ३० नोव्हेंबरच्या आत घ्याव्यात अशा सूचना मुंबई विद्यापीठाने केल्या आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय जून २०२० पासून प्रलंबित होता. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्यात आले होते आणि प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यानंतर १२० दिवसांच्या आत या बॅकलॉग परीक्षा घ्याव्यात असा सूचना कॉलेजांना करण्यात आल्या होत्या. या परीक्षा आता कॉलेज स्तरावर बहुपर्यायी (MCQ) पद्धतीने ऑनलाइन होणार आहेत. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांच्या पदवी परीक्षा देखील अशाच पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. जून महिन्यात राज्य सरकारने परीक्षांबाबत शिफारसी सुचविण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने बॅकलॉग परीक्षांबाबतच्या शिफारसीही दिल्या होत्या. कॉलेज सुरू झाल्यावर या परीक्षा घेण्यात याव्यात अशी समितीची शिफारस होती. पण करोना महामारीच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर कॉलेज प्रत्यक्ष कधी सुरू होणार, त्याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विद्यापीठाला १२० दिवसांच्या आता या परीक्षांची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कारण त्यानंतर नियमित सत्र आणि त्यापुढे परीक्षांवर विद्यापीठाला लक्ष केंद्रित करावं लागणार नाही. 'विद्यापीठाचे गेल्या काही महिन्यात पदवी परीक्षा प्रक्रिया पूर्ण करणे हे प्राधान्य होते. ते पूर्ण झाल्यानंतर आता बॅकलॉग परीक्षांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. एकदा या परीक्षा पूर्ण झाल्या की दिवाळीनंतर सत्रअखेर परीक्षांवर लक्ष केंद्रित केले जाईल,' असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या महाविद्यालयांनी २३ मार्चपूर्वी बॅकलॉग परीक्षा घेतल्या आहेत, अशा महाविद्यालयांना नव्याने परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही. दरम्यान, महाविद्यालयांना १२ ते १८ नोव्हेंबर दिवाळी सुट्टी आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/361kBfo
via IFTTT

Post a Comment

0 Comments