मज्जा!! शाळांना १२ ते १६ नोव्हेंबर २०२० पर्यंत दिवाळीची सुट्टी

Diwali 2020: करोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील शाळा बंद असल्या, तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर झाली आहे. त्यानुसार १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुट्टीच्या कालावधीत कोणतीही परीक्षा घेऊ नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे, याबाबत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून गुरुवारी परिपत्रक जाहीर करण्यात आले. करोनामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. आॅनलाईन शिक्षणामुळे शाळांना दिवाळीची सुट्टी मिळणार की नाही, असा प्रश्न विद्यार्थी व शिक्षकांसमोर होता. शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर होणार असल्याची घोषणा नुकतीच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. त्यानुसार सरकारकडून गुरूवारी तारीख जाहीर करण्यात आली. या कालावधीत इयत्ता पहिली ते बारावीचे आॅनलाइन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असे सरकारकडून परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. सुट्टीच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांची कुठलीही परीक्षा घेऊ नये, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत. तसेच एकूण कामाचे २३० दिवस होणे आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान २०० व इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान २२० होणे आवश्यक असल्याचे सरकारकडून या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mZCSkd
via IFTTT

Post a Comment

0 Comments