Also visit www.atgnews.com
करोनामुळे रद्द होणार का कॅट परीक्षा? निमंत्रकांनी दिली माहिती
IIM postponement official update: भारतीय व्यवस्थापन संस्था IIM सह देशातील विविध प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थांमध्ये एमबीए कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) चे आयोजन करण्यात येणार ाहे. आतापर्यंत नियोजित वेळेनुसार, ही परीक्षा २९ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. पण करोना संक्रमणाची वाढती संख्या लक्षात घेऊन देशभरातून उमेदवारांनी ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आधार घेतला होता. परीक्षा स्थगित होईल की नाही याकडे हजारो उमेदवारांचे डोळे लागले होते. कॅट परीक्षेचे निमंत्रक हर्षल लोवालेकर यांनी परीक्षा स्थगित होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांनी सांगितले की परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार आहे. यंदा कॅटचे आयोजन आयआयएम इंदुर (IIM Indore) द्वारा केले जात आहे. २९ नोव्हेंबर २०२० रोजी तीन सत्रात परीक्षा होणार आहे. पहिले सत्र सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत असेल. दुसरे सत्र दुपारी १२.३० ते २.३० वाजेपर्यंत तर तिसरे सत्र ४.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत असेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3959HZe
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments