शिक्षक, विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार!

राज्यातील विद्यार्थ्यांना आँनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना दिली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात आँनलाईन शिक्षण पध्दती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवले आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे व त्या संबंधितांचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितले. अकरावी काँलेज प्रवेश संदर्भात माननीय मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे, महाअभिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करूनच लवकरात लवकर अकरावीच्या काँलेज प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. काँलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु आँनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थीयांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सुचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील राहील असा विश्वास शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3epsleN
via IFTTT

Post a Comment

0 Comments