यंदाच्या दहावी, बारावी परीक्षा लांबणीवर टाकाव्यात का? शिक्षक, सरकारचे 'हे' मत

पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या बाबतीत पालक, विद्यार्थ्यांना मनात प्रश्नांचे काहूर माजले आहे. यावर्षी कोविड -१९ मुळे बोर्डाच्या परीक्षा जाहीर होण्यास व त्यांचा निकाल लागण्यास बराच विलंब झाला. नवीन शैक्षणिक सत्रही कित्येक महिन्यांच्या विलंबाने सुरू झाले. अशा परिस्थितीत पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण होणार का याची सर्वांना काळजी लागून राहिली आहे. दरम्यान, २०२१ बोर्डाची परीक्षा उशिरा घेण्यात येईल की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनीही एनसीईआरटी (NCERT) च्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ.रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. दिल्ली सरकारला काय हवे आहे? दिल्ली सरकारने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला ( सीबीएसई ) गेल्या महिन्यात पत्र लिहून पुढील वर्षाच्या मे महिन्यापूर्वी बोर्डाच्या परीक्षा घेऊ नयेत अशी विनंती केली होती. तसेच कोविड -१९ मुळे शाळा अजूनही बंद आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम आणखी कमी करावा अशीही विनंती केली होती. शाळांना काय हवे? दिल्लीतल्या अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनीही यासंदर्भात आपले मत मांडले आहे. दिल्लीतील सहोदया स्कूल कॉम्प्लेक्सच्या अध्यक्ष अलका कपूर यांनी या मुद्द्यावर एक सर्वेक्षण केले होते. यात १०० हून अधिक मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. सर्वेक्षणात हा मुद्दा पुढे आला की २०२१ च्या बोर्ड परीक्षा लांबणीवर टाकाव्यात अशी शाळांची इच्छा नाही. बोर्ड परीक्षा स्थगित करणे हा योग्य निर्णय नसेल, असे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. यामुळे उच्च शिक्षणासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आणि नव्या सत्रावर परिणाम होतील. अशा दरवर्षी होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्था दोहोंसमोर समस्या निर्माण होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34UTF1o
via IFTTT

Post a Comment

0 Comments