Also visit www.atgnews.com
CBSE Exam 2021: सीबीएसई बारावी प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर
Board class : कोविड - १९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळांचे शैक्षणिक सत्र विलंबाने सुरू झाले. बहुतांश शाळा आता बंद आहेत आणि वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ३० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र उपलब्ध शैक्षणिक साधनांमध्ये उर्वरित ७० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे देखील विद्यार्थी-शिक्षकांसाठी कठीण जात आहे. याच दरम्यान बोर्डाने २०२१ मधील बोर्ड परीक्षांची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी बोर्डाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी २०२१ च्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची शक्यता फेटाळून लावली होती. परीक्षा निश्चितपणे होणारच असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता सीबीएसईमार्फत बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरही (SOP) देखील तयार करण्यात आले आहे. बोर्डाने सांगितलं आहे की बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १ जानेवारी २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होणार आहे. मात्र तारखांवर अद्याप अंतिम निर्णय होणं शिल्लक आहे. यानंतर प्रॅक्टिकल परीक्षांचे अंतिम वेळापत्रकाचे अंतिम नोटिफिकेशन जारी केले जाईल. कशा होणार प्रॅक्टिकल परीक्षा? बोर्डाने यासंबंधातील एसओपी तयार केले आहे. यानुसार, शाळांना प्रॅक्टिकल परीक्षांसाठी बोर्डाद्वारे विविध तारखा पाठवण्यात येतील. त्या तारखांमध्ये शाळांनी या परीक्षा घेणे अपेक्षित आहे. बोर्डाकडून एक पर्यवेक्षक शाळांमध्ये परीक्षांच्या वेळी उपस्थित असेल. दरम्यान, २०२१ च्या बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. सर्व गोष्टी नियोजनानुसार घडल्या तर परीक्षा नियोजित वेळेतच होतील, असे बोर्डाने सांगितले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kXoCag
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments