CTET Exam: पुढील वर्षी होणार सीटीईटी परीक्षा; नवी तारीख आली

Date Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने () केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) परीक्षा पुढील वर्षी ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ५ जुलै २०२० रोजी होणार होती. यासाठी देशभरातील ११२ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार होणार होते. पण करोना आणि अन्य काही कारणांमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता सीबीएसई बोर्डाने परीक्षेच्या तारखांसंदर्भात नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. ही परीक्षा आता रविवार ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. यावेळ १३५ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार करण्यात आले होते. नव्या परीक्षा केंद्रांची संपूर्ण यादी सीटीईटीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. बदलता येणार परीक्षा केंद्राचं शहर सीबीएसईने उमेदवारांनी परीक्षा केंद्रात बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी आपल्या परीक्षा केंद्राच्या शहरात बदल करायचा असेल त्यांना ७ नोव्हेंबर पासून हा बदल करता येईल. ७ ते १६ नोव्हेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात बदल करता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34W6mcx
via IFTTT

Post a Comment

0 Comments