FYJC Online Admission 2020-21: दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जारी

Round 2 Timetable: मराठा आरक्षण वगळून प्रवेशांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक () जाहीर केले आहे. ही फेरी गुरुवार २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ही फेरी १० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी हे वेळापत्रक अकरावी प्रवेशांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. https://ift.tt/2WnqAHp या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी भेट द्यावी. मुंबई एमएमआर क्षेत्रासह, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश या वेळापत्रकानुसार होतील. प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - २६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजता- नियमित प्रवेश फेरी - २ साठी रिक्त पदे जाहीर करणे २६ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ५ ते १ डिसेंबर रात्री ११.५५ वाजेपर्यंत - १) यापूर्वी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इतर लागू होणारा प्रवर्ग निवडण्याची सुविधा. २) विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भाग १ मध्ये आवश्यकता असल्यास बदल करणे आणि दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवणी. (यापूर्वी भरलेल्या भाग २ मधील पसंतीक्रम बदलता येतील.) ३) या कालावधीत नवीन विद्यार्थी भाग १ आणि २ भरू शकतील. २ डिसेंबर २०२० सायंकाळी ५ वाजेपर्यंत - प्रवेश अर्ज भाग १ ची पडताळणी करणे. ३ डिसेंबर २०२० ते ४ डिसेंबर २०२० - डेटा प्रोसेसिंगसाठी राखीव वेळ ५ डिसेंबर २०२० - दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी या दिवशी सकाळी ११ वाजता जाहीर होईल. ५ डिसेंबर २०२० सकाळी ११.३० ते ९ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत - मिळालेला प्रवेश निश्चित करणे. ९ डिसेंबर २०२० सायंकाळी ८ वाजेपर्यंत - झालेले प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदवण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना अतिरिक्त वेळ. १० डिसेंबर २०२० - प्रवेशाची नियमित फेरी ३ साठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे. प्रवेश होणार मराठा आरक्षण वगळून सर्वोच्च न्यायालयान राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अकरावीचे प्रवेश रखडले होते. अखेर यावर तोडगा काढण्यात आला असून एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या दुसऱ्या फेरीचे सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/365cNKR
via IFTTT

Post a Comment

0 Comments