Also visit www.atgnews.com
एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात: अभाविप
करोनाची पार्श्वभूमी व लॉकडाउन मुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला आहे . लॉकडाउन मधील ऑनलाइन शिक्षणामुळे थेअरी व प्रॅक्टिकल ही विद्यार्थ्यांचे होऊ शकलेले नाही. असे असतानाही महाराष्ट्र सरकारने एमबीबीएस चा परीक्षा ७ डिसेंबर पासून घेण्याचे घोषित केले आहे. या नियोजित परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलाव्या. अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. याबाबतचे निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना अभाविपने पाठवले आहे. याबाबतची माहिती देताना अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे म्हणाले की, राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने (NMC) २५ नोव्हेंबर रोजी निर्देश जारी केले आहेत की, की १ डिसेंबर पासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावीत. या महाविद्यालयातील अभ्यासक्रम पूर्ण करून फेब्रुवारी २०२१ मध्ये एमबीबीएसच्या परीक्षा घेण्यात याव्यात . एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम व राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (NMC) निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात असे स्वप्नील बेगडे यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3llvIFC
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments