Also visit www.atgnews.com
बीएस्सीधारकांना सरकारी नोकरीची संधी; नौदल गोदीत भरती
म. टा. प्रतिनिधी, मुंबई बीएस्सी पदवीधारक उमेदवारांना गोदीत नोकरीची संधी आहे. प्रामुख्याने नौका दुरुस्ती तसेच देखभालीचे काम होणाऱ्या या गोदीत वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी पश्चिम नौदल कमांड मुख्यालयाने जागा काढल्या आहेत. कुलाब्यात नौदलाचा मोठा तळ आहे. नौदलाच्या युद्धनौका तसेच पाणबुड्या तेथे उभ्या केल्या जातात. तसेच समुद्रात उतरण्याआधी या नौकांची संपूर्ण देखभाल व दुरुस्तीदेखेल 'गोदी'तच (डॉकयार्ड) केली जाते. कुलाब्यातील या गोदीतच नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय आहे. त्यांनीच या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या पदाची जाहिरात काढली आहे. जाहिरातीनुसार, उमेदवारांना १६ जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज करायचा आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स किंवा समुद्री विज्ञान (ओशनोलॉजी) यापैकी कुठल्याही विषयात विज्ञान पदवी (बीएस्सी) घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. परंतु त्याखेरीज उमेदवारांना धातू विश्लेषण, धातू तंत्रज्ञान किंवा यांत्रिक कंपने (व्हायब्रेशन), त्याच्याशी संबंधित विश्लेषण तसेच तंत्रज्ञान किंवा वंगण रसायनशास्त्र अशा प्रकारच्या कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे. उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. उमेदवाराची आधी १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. सामान्य इंग्रजी, अंकात्मक क्षमता व सामान्य बुद्धिमता यासाठी प्रत्येकी दहा गुण, विज्ञान व तंत्रज्ञानासाठी २० गुण तसेच संबंधित क्षेत्रावर आधारित ५० गुणांची ही परीक्षा असेल. अर्जासंबंधीची माहिती केंद्र सरकारच्या https://ift.tt/VDqTnG या संकेतस्थळावर मिळू शकेल. जागांचा प्रवर्गनिहाय तपशील - एकूण १४ जागा प्रवर्ग जागा खुला ६ इतर मागासवर्ग ३ एससी २ एसटी २ आर्थिकदृष्ट्या मागास १
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34O02Dz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments