Also visit www.atgnews.com
एम्स पीजी २०२० परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
2020: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी आयोजित केलेल्या प्रवेश प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे ते आपला निकाल वर पाहू शकतात. या परीक्षेद्वारे डीएम / सीएच आणि एमडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा झाली होती. सीबीटी निकालांची घोषणा २० नोव्हेंबर रोजी केली गेली होती आणि नंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेचे आयोजन २ डिसेंबर ते ४ डिसेंबर २०२० या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षेला डिपार्टमेंटल, क्लिनिकल, प्रॅक्टिकल किंवा लॅब बेस्ड असेसमेंट म्हणतात. अंतर्गत भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पाटणा, रायपूर, ऋषिकेश आणि दिल्लीच्या विविध विभागांमधील पीजी कोर्सेसच्या प्रवेशासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांची मेरीट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जारी करण्यात आली. एम्सने जारी केले महत्त्वाचे निर्देश एम्सने पीजी कोर्सेसमध्ये प्रवेशांसाठी निकालासह अन्य महत्त्वाचे निर्देशही एम्सने जारी केले आहेत. यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना ३१ जानेवारीपर्यंत क्वालिफाइंग डिग्री आणि तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणे अनिवार्य आहे. रिपोर्टिंगच्या वेळी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दोन उमेदवारांचे गुण समान असतील तर नियमानुसार वयोमानाच्या निकषानुसार अधिक वयाच्या उमेदवाराला संधी दिली जाईल. निकालासह 'कन्सेन्ट फॉर्म' भरून १९ डिसेंबर २०२० पर्यंत दिलेल्या aiims.reg.sracad@gmail.com या इमेलवर मेल करायचा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Il3a1t
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments