Also visit www.atgnews.com
FYJC Online: दुसऱ्या फेरीनंतर एक लाख १६ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अकरावी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर विविध कोट्यातून मिळून सुमारे एक लाख १६ हजार १२८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. दुसऱ्या यादीत ७६ हजार २३१ विद्यार्थ्यांना कॉलेजे अलॉट करण्यात आले होते. यापैकी अवघ्या २८ हजाी ६१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. ९ सप्टेंबरपासून रखडलेल्या अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली होती. या यादीत प्रवेश निश्चित करण्याची मुदत बुधवारी संपली. यानंतर तिसऱ्या यादीसाठी रिक्त जागांची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. यानुसार तिसऱ्या फेरीसाठी एक लाख १९ हजार ५९१ जागा उपलब्ध राहिल्या आहेत. दुसऱ्या गुणवत्ता यादीत ७६ हार २३१ विद्यार्थ्यांना कॉलेजे अलॉट करण्यात आली होती. यापैकी ३१ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संमती दर्शविली होती. मात्र त्यापैकी अवघ्या २८ हजार ६१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चिती केली. संमती दर्शविलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजांनी संपर्क साधूनही त्यांनी प्रवेश घेण्यास नकार दिला. यामुळे ही परिस्थिती चिंताजनक असल्याची भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पहिला पसंती क्रमाचे कॉलेज अलॉट झालेल्या सुमारे ८ हजार ५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकरला आहे. या विद्यार्थ्यांना आता सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर संधी मिळणार आहे. शाखानिहाय आतापर्यंत झालेले प्रवेश कला १२५३३ वाणिज्य ६३२४८ विज्ञान ३९०१३ एच.एस.व्ही.सी. १३३४ एकूण १,१६,१२८ शाखानिहाय रिक्त जागा कला १४५५७ वाणिज्य ६३३५९ विज्ञान ३८८६९ एच.एस.व्ही.सी . २७९६ एकूण १,१९,५८१
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gBAyh7
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments