Also visit www.atgnews.com
JEE Main 2021 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; परीक्षेची तारीखही जाहीर
JEE Main 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मंगळवारी जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट २०२१ बाबतचं महत्त्वाचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांनी JEE Main च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी प्रक्रियेबाबतचे सविस्तर वेळापत्रक पाहावे. जेईई मेनची नोंदणी प्रक्रिया १५ डिसेंबर २०२० पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत १५ जानेवारी २०२१ पर्यंत आहे. अर्ज शुल्क १६ जानेवारी २०२१ पर्यंत भरता येईल. अर्जात दुरुस्ती करण्यासाठी १८ ते २१ जानेवारी २०२१ पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही परीक्षा २२ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत घेणार आहे. परीक्षेचे अॅडमिट कार्ड फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाणार आहेत. ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ अशी ही दोन सत्रे असतील. जेईईचं पहिलं सत्र फेब्रुवारीमध्ये होईल. नंतरचं सत्र मार्च / एप्रिल / मेमध्ये होईल. विद्यार्थी एका वेळी एक किंवा एकापेक्षा अधिक सत्रांसाठी अर्ज करू शकणार आहेत. एका वेळी केवळ फेब्रुवारीतील सत्रासाठी अर्ज करणारे विद्यार्थी पुन्हा पुढील सत्रासाठीदेखील अर्ज करू शकणार आहेत. जेईई मेन फेब्रुवारी सत्राचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - अर्ज करण्याची सुरुवात - १५ डिसेंबर २०२० अर्ज करण्याची अंतिम मुदत - १५ जानेवारी २०२१ शुल्क भरण्याची अखेरची तारीख - १६ जानेवारी २०२१ अर्जात दुरुस्ती करण्याची मुदत - १८ ते २१ जानेवारी २०२१ अॅडमिट कार्ड - फेब्रुवारीचा पहिला आठवडा परीक्षेची तारीख - फेब्रुवारी २२ ते २५
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34gLGLr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments