ssb vacancy 2020: दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी

SSB Constable Tradesmen Vacancy 2020: दहावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना मिळण्याची मोठी संधी आहे. सशस्त्र सीमा दलात (SSB) कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त जागांसाठी एकदा अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली होती. आता एसएसबीने पुन्हा अर्ज प्रक्रियेसाठी लिंक रिओपन केली आहे. अद्याप ज्यांना अर्ज करता आलेला नाही, अशा उमेदवारांना संधी आहे. रिक्त जागांचा तपशील, नोटिफिकेशन आणि अर्जाच्या थेट लिंक्स दिल्या आहेत. पदांची माहिती कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष - ५७४ पदे कॉन्स्टेबल (लॅब सहाय्यक) - २४ पदे कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) - १६१ पदे कॉन्स्टेबल (आया) महिला - ५ पदे कॉन्स्टेबल (सुतार) - ३ पदे कॉन्स्टेबल (प्लंबर) - १ पद कॉन्स्टेबल (पेंटर) - १२ पदे कॉन्स्टेबल (टेलर) - २० पदे कॉन्स्टेबल (चांभार) - २० पदे कॉन्स्टेबल (माळी) - ९ पदे कॉन्स्टेबल (कुक) पुरुष - २३२ पदे कॉन्स्टेबल (कुक) महिला - २६ पदे कॉन्स्टेबल (धोबी) पुरुष - ९२ पदे कॉन्स्टेबल (धोबी) महिला - २८ पदे कॉन्स्टेबल (न्हावी) पुरुष - ७५ पदे कॉन्स्टेबल (न्हावी) महिला - १२ पदे कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) पुरुष - ८९ पदे कॉन्स्टेबल (सफाई कामगार) महिला - २८ पदे कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) पुरुष - १०१ पदे कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) महिला - १२ पदे कॉन्स्टेबल (वेटर) पुरुष - ०१ पद एकूण संख्या - १५२२ शैक्षणिक पात्रता सर्व पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळांकडून दहावी / मॅट्रिक उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. याशिवाय काही पदांसाठी स्वतंत्र पात्रता मागविण्यात आली आहे. जसे की - ड्रायव्हरसाठी अवजड वाहन ड्रायव्हिंग लायसन्स, लॅब असिस्टंटसाठी लॅब असिस्टंट कोर्स प्रमाणपत्र आदी. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करून तपशीलवार माहिती मिळू शकेल. अर्ज कसा करायचा या भरती प्रक्रियेचा एक भाग होण्यासाठी तुम्हाला ssb.nic.in द्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल. २१ नोव्हेंबर २०२० पासून अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. उमेदवार २० डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. इतर प्रवर्गांसाठी अर्ज विनामूल्य आहे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, ट्रेड परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीच्या आधारे निवड केली जाईल. SSB Constable Tradesmen Notification 2020 वाचण्यासाठी रिओपन नोटिफिकेशन पाहण्यासाठी अर्ज करण्यासाठी SSB च्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fWA30W
via IFTTT

Post a Comment

0 Comments