Also visit www.atgnews.com
UPSC त नोकरभरती; कोणती पदे, निवड कशी...वाचा
UPSC Recruitment 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ने अधीक्षक (प्रिंटिंग) च्या एका पदासह स्टॅटेस्टिकल ऑफिसर (प्लानिंग / स्टॅटेस्टिक्स) च्या ३५ रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर upsconline.nic.in वर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ डिसेंबर २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी यूपीएससीने वेगवेगळे नोटिफिकेशन जारी केले आहेत. नोटिफिकेशनच्या माध्यमातून रिक्त पदांची जागा, शैक्षणिक योग्यता, वयोमर्यादा आणि संबंधित अन्य पात्रता आदी माहिती पाहू शकाल. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे होणार आहे. उमदेवारांना त्यांनी केलेल्या ऑनलाइन अर्जांच्या आधारे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. निवड प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन नोटिफिकेशन तपशीलवार वाचा. ऑनलाइन अर्ज कसा करायचा? ऑनलाइन अर्जासाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर upsconline.nic.in वर जा. होमपेजवर वर उपलब्ध विविध पदांवर ऑनलाइन भरतीच्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. आता एक नवं पेज उघडेल. तेथे अधीक्षक (प्रिंटिंग) आणि स्टॅटेस्टिकल ऑफिसर पदांसाठी अर्ज करण्याच्या वेगवेगळ्या लिंक दिल्या आहेत. उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या अप्लाय नाऊ लिंकवर क्लिक करा. आता पुन्हा एक नवं पेज उघडेल. येथे महत्त्वाच्या सूचना वाचा आणि पुढे जा. यानंतर न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. आता रजिस्ट्रेशन पेज उघडेल. तेथे विचारलेली सर्व माहिती भरा आणि सेव्ह करा. तेथे तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल. आता रजिस्ट्रेशन पेजवर पुन्हा या. येथे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून लॉग इन करा. आता तुम्ही पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. या भरतीसंबंधीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी यूपीएससी स्टॅटेस्टिकल ऑफिसर / अधीक्षक (प्रिंटिंग) पदासाठी अर्ज करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3loSKLS
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments