Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारीला
Convocation 2020: मुंबई विद्यापीठाचा २०२० चा शैक्षणिक वर्षाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न होणार आहे. यासाठी प्रथम सत्र २०२० मध्ये विद्यापीठाने घेतलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रावर मराठी (देवनागरी) नाव अचूक यावे म्हणून मराठी (देवनागरी) नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी व पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचा तपशील विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०२१ पासून ते २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पदवी प्रमाणपत्रावरील मराठी (देवनागरी ) नावाचा तपशील तपासणीसाठी उपलब्ध सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन आपला मराठी (देवनागरी ) नावाचा तपशील अचूक आहे का हे पहावे असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे. महाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक आहे. या लिंक दुरुस्तीसाठी २२ जानेवारीपासून अॅक्टिव्ह होतील. महाविद्यालयांनी लॉगइन आयडी आणि पासवर्ड देऊन लिंक ओपन करावी. विद्यार्थ्यांसाठीही करेक्शनची स्वतंत्र लिंक आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3peNqgZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments