शिक्षण की नोकरी? गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनो, इथे लक्ष द्या...

सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर - आनंद हा कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षाला आहे. आतापासूनच त्याला सगळे विचारायला लागले आहेत, पुढे काय? एमबीए की एमकॉम की आणखी कुठला कोर्स की नोकरी करणार? - स्वानंदी इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. तिला वेगळेच प्रश्न पडले आहेत. भारतात शिक्षण घेऊ की परदेशात की कॅम्पस प्लेसमेंट घेऊ? सध्या नोकरीच्या संधी कमी आहेत, स्पर्धा जास्त आहे, नेमकं काय करायचं? अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे विद्यार्थ्यांना असे अनेक प्रश्न भेडसावत असतात. स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी सगळेच जण आपापल्यापरीनं प्रयत्नशील असतात. शाळा नंतर कॉलेज आणि त्यानंतर उच्चशिक्षण किंवा नोकरी ही ठरलेली वाटचाल. सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अजूनच गोंधळ आणि चिंता निर्माण झाली आहे. उच्च शिक्षण घ्यायचं? (तेही कोणत्या क्षेत्रात?) की मिळेल ती नोकरी करायची? हा संभ्रम वाढतच आहे. त्याची अनेक कारणं आहेत. त्यातील काही कारणं पुढीलप्रमाणे... - वाढती सुशिक्षित जनसंख्या- आजकाल पदवीधर आणि उच्चशिक्षितांची संख्या वाढत आहे. त्यात जर आपण किमान शिक्षण नाही घेतलं तर काय होईल? हा विचार मनाच डोकवतो. - आर्थिक स्वावलंबन- अनेक वेळा विद्यार्थ्यांना आर्थिकरित्या लवकरात लवकर स्वतंत्र आणि स्वावलंबी होण्याची इच्छा असते. - अनेक पर्याय- ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे आणि अनेक स्पेशलायझेशन कोर्सेसमुळे उपलब्ध होणारे अनेक पर्याय. नेमका कोणता कोर्स करावा? हे अनेकांना कळत नाही. मग हा तिढा सोडवायचा कसा? पुढील काही घटकांमुळे तिढा सोडला जाऊ शकतो... - स्वतःचा कल- तुम्हाला स्वतःला उच्चशिक्षण घ्यायचं आहे की नोकरी? या प्रश्नाचं उत्तर शोधा. - गरज- तुम्ही जो कोर्स/ करिअर निवडलं आहे त्यासाठी पुढील शिक्षण महत्त्वाचं आहे की कामाचा अनुभव? हे जाणून घ्या. प्रत्येक क्षेत्रासाठी उच्चशिक्षणच गरजेचं नसतं, हे समजून घ्या. काही क्षेत्रं अशी आहेत जिथे कामाचा अनुभव महत्त्वाचा ठरतो. - जबाबदारी- आपली आर्थिक परिस्थीती किंवा कौटुंबिक जबाबदारी काय आहे ते समजून घ्या. - वेळ- आपण करिअर घडवण्यासाठी अजून किती वर्षं गुंतवू शकतो, हे जाणून घ्या. - उच्चशिक्षणाचा खर्च- उच्चशिक्षणासाठी लागणारा खर्च आपल्याला झेपणार आहे का? हे जाणून घ्या. शिक्षण घ्यावं की नोकरी करावी? याचं उत्तर शोधण्यासाठी कोणताही फॉर्म्युला किंवा अचूक असं उत्तर नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची गरज, प्राधान्यक्रम, कल, क्षमता आणि आर्थिक परिस्थिती भिन्न असते. स्वतःची आंतरिक बाजू समजून आणि बहुताली काय सुरु आहे, बाजारपेठेची काय मागणी आहे याची जाण ठेवूनच निर्णय घेऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनतीची तयारी ठेवा आणि निर्णय विचारपूर्वक घेतला असेल तर तुम्हाला यश नक्की मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2M0ZWlQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments