सी-डॅकमध्ये विविध १०० पदांवर भरती

CDAC Recruitment 2021: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग अर्थात C-DAC मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. प्रोजेक्ट इंजिनीअर्स पदांसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एक वर्षासाठी नियुक्ती दिली जाईल. प्रकल्पाच्या गरजेनुसार या नियुक्तीला तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकेल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रकल्पाच्या गरजेनुसार, एका प्रकल्पावरून दुसऱ्या प्रकल्पावर बदली म्हणून पाठवले जाऊ शकते. इच्छुक आणि योग्य उमेदवार १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. पदांची माहिती पोस्ट कोड - पदाचे नाव - मासिक वेतन - रिक्त पदे 01: PE:Devp - प्रोजेक्ट इंजिनीअर - ३१,००० ते ३६,१५८ रुपये - ४० पदे 02: PE: SDevp - प्रोजेक्ट इंजिनीअर - ३९,०५१ ते ४५,५४९ रुपये - ४० पदे 01: PT:JDevp - प्रोजेक्ट टेक्निशिअन - १४,५८९ - २० पदे पदांची एकूण संख्या - १०० हेही वाचा: शैक्षणिक पात्रता AICTE / UGC मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून किंवा स्वायत्त विद्यापीठातून इंजिनीअरिंग पदवी. अधिक माहिती भरतीसंदर्भातील नोटिफिकेशनमध्ये वाचावी. हेही वाचा: हेही वाचा: वयोमर्यादा ऑनलाइन मुलाखतींद्वारे निवड केली जाईल. मुलाखती वृत्तपत्रात जाहीरात दिल्यानंतर एका आठवड्यात सुरू होतील. मुलाखतींच्या वेळापत्रकासाठी उमेदवारांनी C-DAC चे संकेतस्थळ नियमितपणे पाहावे. अर्ज कसा करावा? अर्ज करण्यासाठी उमेदवारांचा एक वैध ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक असावा. ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक या भरती प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत अॅक्टिव्ह राहावा. recruit-mumbai@cdac.in या ईमेलवर उमेदवारांना आपला अर्ज पाठवायचा आहे. सब्जेक्टमध्ये पोस्टचे नाव आणि पोस्ट कोडचा उल्लेख करायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aievcz
via IFTTT

Post a Comment

0 Comments