अलिगढ मुस्लिम विद्यापीठ प्रजासत्ताक दिनी साजरा करणार शतकमहोत्सव

उत्तर प्रदेशमधील अलिगढ मुस्लिम विद्यापीठासाठी () यंदाचा प्रजासत्ताक दिन () खूप खास आणि ऐतिहासिक आहे. या दिवशी, एएमयूच्या १०० वर्षांच्या नेत्रदीपक प्रवासाची आठवण ठेवणारा दस्तावेज असलेली एक 'टाइम कॅप्सूल' विद्यापीठ परिसरात जमिनीत ठेवली जाणार आहे. एएमयूचे प्रवक्ते राहत अबरार यांनी रविवारी सांगितले की, टाईम कॅप्सूल मध्ये ठेवण्यात येणारा दस्तऐवज विद्वानांच्या गटाने तयार केला आहे. या दस्तऐवजात १९२० साली मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे अलिगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाल्याचा अविस्मरणीय प्रवास वर्णन केला आहे. विद्यापीठाच्या परिसराचं हृदय समजल्या जाणार्‍या व्हिक्टोरिया गेटसमोर दीड टन वजनाच्या या स्टील कॅप्सूलला ३० फूट खोल खड्डा खणून ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. एएमयूचे कुलगुरू प्रा. तारिक मन्सूर या ऐतिहासिक कार्यक्रमाचे सूत्रधार असतील, असे अबरार यांनी सांगितले. विशेष म्हणजे १८७७ मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेले हे मुस्लिम एंग्लो ओरिएंटल महाविद्यालय अस्तित्वात आल्यानंतरही अशीच एक कॅप्सूल महाविद्यालयाच्या आवारात पुरण्यात आली. त्यातही या संस्थेच्या स्थापनेशी संबंधित इतिहासाची कागदपत्रे ठेवली गेली. सन १९२० मध्ये या महाविद्यालयाला संसदेने कायदा करून विद्यापीठाचा दर्जा दिला. पूर्वी पुरलेली कॅप्सूल बाहेर काढण्यात येईल की नाही हे एएमयू प्रशासनाने स्पष्ट केले नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oea0VC
via IFTTT

Post a Comment

0 Comments