Also visit www.atgnews.com
ठाणे ग्रामीणमधील शाळांची घंटा २७ जानेवारीपासून घणघणणार
करोनाच्या दीर्घ कालावधीनंतर अखेर शाळेची पहिली घंटा २७ जानेवारीला वाजणार आहे. करोनासंदर्भात सरकारच्या नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्यासाठी ग्रामीण पातळीवर विविध प्रयत्न व उपाययोजना केल्या जात आहेत. शाळेचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांची करोना चाचणी, शाळा परिसरातील स्वच्छता, हात धुण्याची सुविधा, पल्स ऑक्सिमीटर, हात धुण्याची सुविधा, सॅनिटायझर अशा विविध उपाययोजना ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केल्या जात आहेत. शाळा सुरू होत असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. करोना संसर्गामुळे बंद असलेल्या ग्रामीण परिसरातील शाळांचे कुलूप काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून २७ जानेवारीपासून केला जाणार आहे. या निर्णयानंतर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक झाली असून शिक्षक, मुख्याध्यापकांना करोनासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या तसेच आश्रमशाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी २२ जानेवारी रोजी दिले. ठाणे जिल्ह्यातील शाळा विद्यार्थ्यांसाठी १६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आता ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळांसह आश्रमशाळा सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. शहरी भागांतील सर्व शाळांबाबत स्वतंत्रपणे राज्य सरकारच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घेण्यात येतील. तसेच अंबरनाथ व कुळगाव, बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील शाळांबाबत वेगळे निर्देश देण्यात येतील. शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल, असेही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36dW87p
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments