CAT Result 2020: कॅट परीक्षेचा निकाल जाहीर

CAT Result 2020: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूर () ने कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2020) चा निकाल जाहीर केला आहे. अधिकृत संकेतस्थळ वर हा निकाल उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी कॅट परीक्षा दिली होती, त्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला निकाल पाहावा. यासाठी उमेदवारांना यूजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगइन करावं लागेल. देशभरात विविध व्यवस्थापन संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कॅट परीक्षा घेण्यात येते. पुढील पद्धतीने डाऊनलोड करा कॅट २०२० निकाल : - सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर जा. - होमपेजवर Download Cat 2020 Score Card च्या लॉगइन लिंक वर क्लिक करा. आता एक नवी विंडो ओपन होईल. - आता उमेदवारांनी आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे. - आता उमेदवारांचे स्कोअर कार्ड स्क्रीनवर दिसेल. - स्कोअर कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून ठेवा. आयआयएम, इंदूरने कॉमन अॅडमिशन टेस्ट म्हणजेच कॅट परीक्षा २०२० चे आयोजन २९ नोव्हेंबर २०२० रोजी केले होते. संगणकीकृत माध्यमातून एकूण तीन स्लॉटमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे सव्वा दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली. करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक संपूर्ण खबरदारीसह, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून परीक्षा घेण्यात आली होती. दोन तासांच्या या परीक्षेत तीन विभागांत प्रश्न विचारण्यात आले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38TfKhF
via IFTTT

Post a Comment

0 Comments