जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची तारीख, IIT प्रवेश निकषांची घोषणा 'या' दिवशी

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक येत्या ७ जानेवारी रोजी एक महत्त्वाची घोषणा करणार आहेत. देशभरातील आयआयटींमधील (IIT) अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी प्रवेश परीक्षा म्हणजेच जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम () अॅडव्हान्स्डच्या तारखेची घोषणा शिक्षणमंत्री करणार आहेत. आयआयटी प्रवेशांसाठी आवश्यक पात्रता यंदा काय असणार आहे, याबाबतची घोषणा देखील पोखरियाल यावेळी करणार आहेत. शिक्षणमंत्र्यांनीच स्वत: ट्विटर हँडलद्वारे ही माहिती दिली आहे. ७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता शिक्षणमंत्री घोषणा करणार आहेत. दरम्यान, जेईई मेन () च्या तारखेची घोषणा यापूर्वीच पोखरियाल यांनी केली आहे. जेईई मेन परीक्षा यंदा चार वेळा होणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान परीक्षा होईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत १६ जानेवारी २०२१ आहे. पोखरियाल यांनी ट्विट केले आहे की, 'प्रिय विद्यार्थ्यांनो, आयआयटींमधील प्रवेशासाठी पात्रतेचे निकष आणि जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेच्या तारखेची घोषणा मी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता करणार आहे.' ७ जानेवारी रोजी #EducationMinisterGoesLive कार्यक्रम होणार आहे. थेट अॅडव्हान्स्डला बसण्याची मुभा कोविड -१९ महामारी काळात ज्या विद्यार्थ्यांना जेईई मेन २०२० परीक्षा पात्र होऊनही जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देता आली नव्हती, त्यांच्यासाठी यंदा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला थेट बसण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना यंदा पुन्हा जेईई मेन परीक्षा द्यावी लागणार नाही. मध्ये अनेक बदल बी.ई. आणि बी.टेक्. साठी होणारी जेईई मेन परीक्षा यंदा चार वेळा होणार आहे. म्हणजे एकदा परीक्षा हुकली तरी विद्यार्थ्यांनी ती देण्यासाठी अन्य तीन संधी मिळणार आहेत. विद्यार्थी एकापेक्षा अधिक वेळा ही परीक्षा देऊ शकतात. त्यांचा बेस्ट स्कोर ग्राह्य धरला जाणार आहे. दुसरं म्हणजे ही परीक्षा तब्बल ११ प्रादेशिक भाषांमध्ये होणार आहे. पेपर पॅटर्नमध्येही बदल यंदा करोनामुळे अनेक राज्यांनी दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमात कपात केली आहे. हे लक्षात घेऊन जेईई मेन परीक्षेचा पॅटर्न बदलण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एकूण ९० प्रश्नांपैकी कोणतेही ७५ प्रश्न सोडवायचे आहेत. या ९० प्रश्नांमध्ये सर्व सिलॅबस कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KXpiQV
via IFTTT

Post a Comment

0 Comments