Also visit www.atgnews.com
JEE Main 2021: अर्जांच्या दुरुस्तीला आजपासून सुरुवात
Update: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Main) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विंडो २७ जानेवारीपासून खुली केली आहे. उमेदवारांना काही दुरुस्ती असल्यास ते त्यांचे लॉगइन वापरून त्यांच्या अर्जात दुरुस्ती करु शकतात. यासाठी जेईईचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in येथे जाऊन ऑनलाइन दुरुस्ती करण्याची संधी एनटीएने दिली आहे. दुरुस्ती करण्यासाठी ३० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्जातील माहिती बदलता येणार नाही. काही माहिती जसे विद्यार्थ्याचे नाव, संपर्क क्रमांक किंवा पत्ता, प्रवर्ग, शैक्षणिक माहिती, जन्मतारीख, परीक्षा केंद्रांचे शहर आदी माहितीत बदल करता येईल. दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्तीबाबतची विनंती स्वीकारण्यात येणार नसल्याचं एनटीएने परिपत्रकात म्हटलं आहे. जेईई मेन २०२१ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २३ जानेवारी रोजी संपली आहे. ही परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घेतली जाणार आहे. अॅडमिट कार्ड फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जारी केले जाणार आहेत. यंदा ही परीक्षा चार वेळा घेतली जाणार आहे. विद्यार्थी चार पैकी कोणतीही एक किंवा सर्व चार परीक्षांना बसू शकतात. त्यांचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यंदा जेईई मेन परीक्षेच्या पॅटर्नमध्येही बदल करण्यात आला आहे. १५ बहुपर्यायी प्रश्नांना नकारात्मक मूल्यांकन नसेल. प्रश्नपत्रिकेत ९० प्रश्न विचारले जातील, यापैकी ७५ प्रश्नच सोडवायचे आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स अशा प्रत्येक विभागात २५ प्रश्न विचारले जातील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3a1XALm
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments