MHT CET 2020 च्या दुसऱ्या फेरीची सीट अलॉटमेंट जाहीर

महाराष्ट्र सीईटी कक्षाने च्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर केली. सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर हा सीट अलॉटमेंट निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार cetcell.mahacet.org वर जाऊन आपल्या प्रवेशाची स्थिती जाणून घेऊ शकतात. समुपदेशनाची वेबसाइट www.fe2020.mahacet.org वर जाऊन देखील सीट अलॉटमेंट निकाल पाहता येईल. हा निकाल डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख ही माहिती देऊन लॉगइन करावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरी प्रवेश मिळाला आहे त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये ३० जानेवारी २०२१ पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. दुसऱ्या फेरीचा निकाल डाऊनलोड कसा कराल? - fe2020.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर जा. - CAP II status या पर्यायावर क्लिक करा. - तुमचा अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगइन करा. - MHT CET 2020 counselling ची सीट अलॉटमेंट स्थिती स्क्रीनवर दिसेल. - अॅडमिशन अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भाकरिता प्रिंट आऊट घेऊन ठेवा. जेईई मेन २०२१ साठी अर्ज दुरुस्ती करता येणार नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Main) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विंडो २७ जानेवारीपासून खुली केली आहे. उमेदवारांना काही दुरुस्ती असल्यास ते त्यांचे लॉगइन वापरून त्यांच्या अर्जात दुरुस्ती करु शकतात. यासाठी जेईईचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in येथे जाऊन ऑनलाइन दुरुस्ती करण्याची संधी एनटीएने दिली आहे. दुरुस्ती करण्यासाठी ३० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KQzfPY
via IFTTT

Post a Comment

0 Comments