Also visit www.atgnews.com
SBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी
SBI PO Main : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) प्रोबेशनरी ऑफिसर मुख्य परीक्षा २०२०-२१ साठी प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड जारी केले आहे. एसबीआयने अॅडमिट कार्डची लिंक अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जारी केली आहे. हे अॅडमिट कार्ड आयबीपीएसची वेबसाइट ibps online द्वारे देखील डाऊनलोड करता येईल. एसबीआयने अलीकडेच सोमवारी PO Prelims 2022 चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेस हजर राहावे लागेल. ते उमेदवार पुढे दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून मुख्य परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. त्यासाठी त्यांना आपल्या एसबीआय पीओ रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल. प्रवेशपत्र मंगळवारी १९ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आले आहे. डाउनलोड लिंक अधिकृत वेबसाइटवर २९ जानेवारी २०२१ पर्यंत उपलब्ध असेल. यापूर्वी तुमचे अॅडमिट कार्ड डाउनलोड करा. प्रवेश पत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, हे लक्षात घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39OHlkx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments