Also visit www.atgnews.com
BHEL Vacancy 2021: बीएचईएल मध्ये विना परीक्षा अप्रेंटिसशीप; दहावी उत्तीर्णांना संधी
Apprentice Recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) ने ट्रेड अप्रेंटिससाठी विविध प्रकारच्या पदांवर भरती (Jobs 2021) प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांवर योग्य उमेदवारांची थेट भरती होणार आहे. या सरकारी नोकरीसाठी (Sarkari Naukri) कोणतीही परीक्षा होणार नाही. बीएचईएलने या भरतीसाठी (Vacancy 2021) नोटिफिकेशन जारी केले आहे. ऑनलाइन अर्जांची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पदांची भरती संदर्भातील संपूर्ण माहिती वाचून तुम्ही पुढे दिलेल्या लिंकद्वारे नोटिफिकेशन पाहू शकता आणि अर्ज करू शकता. पदांची माहिती इलेक्ट्रीशियन - ८० पदे फिटर - ८० पदे वेल्डर - २० पदे टर्नर - २० पदे मशीनिस्ट - ३० पदे ड्राफ्ट्समन (मेकॅनिक) - ५ पदे इलेक्ट्रॉनिक्स (मेकॅनिक) - ५ पदे COPA / PASAA - ३० पदे कारपेंटर - ५ पदे प्लंबर - ५ पदे मेकॅनिक मोटर व्हीकल - ५ पदे मशीनिस्ट (ग्राइंडर) - ५ पदे गवंडी (MES) - ५ पदे पेंटर - ५ पदे आयटीआय ट्रेड अप्रेंटिससाठी पदांची एकूण संख्या - ३०० आवश्यक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय (ITI) डिप्लोमा कोर्स केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. हेही वाचा: वयोमर्यादा उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षे वयादरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अर्ज कसा करावा? ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice) पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला NAPS Portal वर नोंदणी करावी लागेल. येथे नोंदणी करताच तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने तुम्ही बीएचईएल भोपाळ (BHEL Bhopal) च्या वेबसाइट वर जाऊन नोंदणी करा. रजिस्ट्रेशन लिंक्स पुढे दिल्या आहेत. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oY2QVE
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments