Also visit www.atgnews.com
महावितरणमध्ये ७ हजार जागांवर जम्बो भरती; बारावी उत्तीर्णांना संधी
2021: ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र सरकारची वीज वितरण कंपनी महावितरण मध्ये तब्बल ७ हजार पदांवर जम्बो भरती केली जात आहे. विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक अशी ही पदं आहेत. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) ने या भारती संदर्भातील जाहीरात दिला आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत २० मार्च २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इच्छुक उमेदवार mahadiscom.in या महाडिस्कॉमच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरू शकतात. सात हजार पदांपैकी पाच हजार पदे विद्युत सहाय्यकांची तर दोन हजार पदे उपकेंद्र सहाय्यकांची आहेत. पदांची प्रवर्गनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे - प्रवर्ग - विद्युत सहाय्यक -- उपकेंद्र सहाय्यक सर्वसाधारण - १६३७ -- ६५६ महिला - १५०० -- ६०० क्रीडापटू - २५० -- ९८ माजी कर्मचारी - ७५० -- ३०० प्रकल्पग्रस्त - २५० -- ९९ भूकंपग्रस्त - ९९ -- ४० शिकाऊ उमेदवार - ५०० -- २०१ अनाथ - १४ -- ६ एकूण - ५००० -- २००० वयोमर्यादा सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ. माजी कर्मचारी आणि दिव्यांगांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे. MAHADISCOM Recruitment 2021 साठी पात्रता उमेदवारा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. सोबत बिझनेस स्टोरीजचे नॅशनल ट्रेड ट्रेनिंग सर्टिफिकेट किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेंटर) किंवा इलेक्ट्रिशिअन / टर्शिअरी दोन वर्षांचे पदविका प्रमाणपत्र आवश्यक. अर्जांचे शुल्क अर्ज नि:शुल्क आहे. वेतन श्रेणी विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक पदाची वेतनश्रेणी १८ हजार ते २७ हजार रुपये मासिक आहे. (टेन्टेटिव्ह) निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतींद्वारे निवड केली जाईल. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uwrUXJ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments