मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ

2021: पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठी अर्ज सादर करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी २ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ही लिंक २६ फेब्रुवारी पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. २० मार्च २०२१ नंतर ॲानलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० दरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यास तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत विद्यापीठाकडे पेट परीक्षेसाठी १० हजार ६४ एवढे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये पीएचडी साठी ९ हजार ६७५ तर एमफील साठी ३८९ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/387Z1rF
via IFTTT

Post a Comment

0 Comments