आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी रविवारी परीक्षा

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागामधील रिक्तपदे भरण्यासाठी रविवारी २८ फेब्रुवारी रोजी राज्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. करोनाला हरवून पुन्हा जनतेच्या सेवेसाठी आरोग्यमंत्री सज्ज झाले असून त्यांनी आज पत्राद्वारे राज्यातील परीक्षार्थींना शुभेच्छा देत ही निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार असल्याचे म्हटले आहे. आरोग्य विभागातील विविध पदांसाठी ही परीक्षा होत असून परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. केवळ गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार असून आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. करोनाचे निदान झाल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करतानाच त्यांनी रुग्णालयातून पत्राद्वारे नागरिकांना मास्क वापरणे आणि करोना नियमांचे पालन करण्याबाबतचे भावनिक आवाहन केले होते. त्याच बरोबर त्यांनी राज्यातील विद्यार्थी आणि तरुणाईला देखील पत्र लिहून कोरोना प्रतिबंधासाठी स्वतःबरोबर कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r76wGM
via IFTTT

Post a Comment

0 Comments