CA May Exam 2021: सीए मे परीक्षेच्या तारखा जाहीर

Date Sheet: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने मे परीक्षा 2021 चे वेळापत्रक शुक्रवारी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी जारी केले आहे. हे वेळापत्रक इंटरमीडिएट आणि फायनल अशा दोन्ही अभ्यासक्रमांसाठी आहे. हे वेळापत्रक आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळ .org पर उपलब्ध आहे. परीक्षा २१ मे पासून सुरू होणार आहे आणि ६ जून २०२१ रोजी संपणार आहे. परीक्षा एकाच सत्रात होणार आहे. सर्व दिवशी सर्व पेपर्ससाठी दुपारी ३ ते सायंकाळी ६ असा परीक्षेचा कालावधी असेल. अपवाद केवळ फायनल कोर्स पेपरचा आहे. फाइनल कोर्स ६ विषयाची परीक्षा दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असेल. इंटरमीडिएट (IPC) कोर्स परीक्षा - ओल्ड स्कीम - ग्रुप १- २२ मे, २४ मे, २७ मे आणि २९ मे २०२१ - ग्रुप ११- ३१ मे, २ जून आणि ४ जून २०२१ इंटरमीडिएट कोर्स परीक्षा - न्यू स्कीम - ग्रुप १- २२ मे, २४ मे, २७ मे आणि २९ मे २०२१ - ग्रुप ११- ३१ मे, २ जून, ४ जून आणि ६ जून फायनल कोर्स परीक्षा (ओल्ड आणि न्यू स्कीम) - ग्रुप १- २१ मे, २३ मे, २५ मे आणि २८ मे - ग्रुप ११- ३० मे, जून १, जून ३ आणि ५ जून परीक्षेसाठी अर्ज उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर ३१ मार्च से १३ एप्रिल २०२१ पर्यंत उपलब्ध राहतील. उमेदवारांना विसा किंवा MAESTRO क्रेडिट / डेबिट कार्ड / रुपे कार्ड / नेट बैंकिंग / भीम यूपीआय या उपयोग करून परीक्षा शुल्क भरायचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37vEKvD
via IFTTT

Post a Comment

0 Comments