CSIR UGC NET चा निकाल जाहीर

NTA CSIR NET Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सीएसआयआर यूजीसी नेट () चा निकाल जाहीर केला आहे. एनटीएच्या अधिकृत वेबसाइट आणि csirnet.nta.nic.in वर निकाल जाहीर केला आहे. या वृत्तात दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करूनही तुम्ही निकाल तपासू शकतात. डायरेक्ट लिंक वर क्लिक केल्यानंतर एनटीए सीएसआयआर निकालाचे पेज उघडेल. तेथे आपला अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, स्क्रीन वर दिसणारी सिक्युरिटी पिन भरून सबमिट करा. तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल. निकाल डाऊनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घेऊन ठेवा. ही परीक्षा १९, २१ आणि २६ नोव्हेंबर २०२० रोजी देशभरात आयोजित करण्यात आली होती. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी मध्ये वादळ आल्यामुळे ही परीक्षा ३० नोव्हेंबर २०२० ला घेतली होती. परीक्षा संगणकीकृत मोडवर घेण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2MxoN0Q
via IFTTT

Post a Comment

0 Comments