स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

SSC Exam Dates 2021 Important Notice: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मार्च ते एप्रिल २०२१ महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे सुधारित कॅलेंडर जारी केले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटवर सुधारित कॅलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आयोगाने एक परिपत्रक जारी करत विविध परीक्षांच्या सुधारित वेळापत्रकाबाबत माहिती दिली आहे. उमेदवार एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर ssc.nic.in वर जाऊन हे वेळापत्रक पाहू शकतात. परिपत्रकात म्हटले आहे की १ ऑक्टोबर २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विविध परीक्षांबाबतचं तात्पुरतं कॅलेंडर आयोगाने ७ ऑक्टोबर रोजी जारी केले होते. आता मार्च ते एप्रिल २०२१ या दरम्यान होणाऱ्या काही राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा निवडणुकांमुळे काही परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या शेड्युलनुसार, ज्युनियर इंजिनीयर पेपर १ परीक्षा २०२० आता २२ मार्च ते २४ मार्च २०२१ या कालावधीत आयोजित केली जाईल. मात्र, अगोदरच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा २२ ते २५ मार्च २०२१ या कालावधीत होणार होती. दुसरीकडे, सीपीओ परीक्षा म्हणजेच दिल्ली पोलीस सब इन्स्पेक्टर, CAPF आणि CISF SSE परीक्षा २०१९ ची पेपर 2 ची परीक्षा, जी २६ मार्च २०२१ रोजी होणार होती, ती आता ८ मे २०२१ रोजी आयोजित केली जाईल. स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी परीक्षा २०२० च्या तारखांची घोषणा नंतर केली जाणार आहे. सीएचएसएल टियर 1 परीक्षा 2020 साठी ज्या उमेदवारांनी पश्चिम बंगाल मधील परीक्षा केंद्रांची निवड केली आहे, त्यांची परीक्षा आता २१ ते २२ मे २०२१ या कालावधीत आयोजित केली जाईल. अन्य उमेदवारांसाठी मात्रक ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार १२ ते २७ एप्रिल २०२१ या कालावधीत होईल. ज्युनिअर इंजिनीअर पेपर २ परीक्षा २०१९ नियोजित वेळी २१ मार्च २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eQajov
via IFTTT

Post a Comment

0 Comments