Also visit www.atgnews.com
अभिनेता सोनू सूद देणार १ लाख बेरोजगारांना रोजगार
तुम्ही बेरोजगार आहात, नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. अभिनेता गरजवंतांसाठी पुन्हा एकदा धावून आला आहे. त्याने तब्बल एक लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली आहे. टि्वटरवरून त्यानी माहिती दिली आहे. त्याने केलेल्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की त्यांनी सुमारे १० कोटी लोकांचं आयुष्य बदलण्याची योजना आहे. यासाठी तो एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था करणार आहे. हे काम अर्थात टप्प्प्याटप्प्याने केलं जाणार आहे. पुढील पाच वर्षांच्या आत सुमारे १० कोटी लोकांचे आयुष्य बदलण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं सोनू सूदनं जाहीर केलं ाहे. यासाठी त्याने एक अॅप तयार केला आहे. या अॅपची माहिती देत तो डाऊनलोड करण्याचं आवाहन त्यानं केलं आहे. तो लिहितो - नया साल, नई उम्मीदें नई नौकरी के अवसर.... और उन अवसरों को आपके करीब लाते, नए हम। प्रवासी रोज़गार अब है गुडवर्कर। आज ही गुडवर्कर एप्लिकेशन को डाउनलोड करें और बेहतर कल की उम्मीद करें लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद गरीबांचा मसीहा म्हणून ओळखला जाऊ लागला. हजारो गरीब मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सोनुनं मदत केली होती. सोनू सूद याचं ट्विट पुढीलप्रमाणे - लोकांनी सोनूच्या या आवाहनलाना भरभरून प्रतिसाद दिला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lg2yJu
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments