Also visit www.atgnews.com
CMAT 2021 परीक्षेची तारीख जाहीर; अॅडमिट कार्ड कधी... जाणून घ्या
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने (CMAT) परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा ३१ मार्च रोजी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२/१२.३० आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ / ६.३० अशी दोन सत्रात परीक्षा होणार आहे. ज्या उमेदवारांना CMAT परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते एनटीएच्या संकेतस्थळावरू जाऊन परीक्षेचं वेळापत्रक पाहू शकतात. या परीक्षेचं अॅडमिट कार्ड २४ मार्चला जारी केलं जाणार आहे. यासंबंधीचं परिपत्रक एनटीएने जारी केलं आहे. त्यात असं म्हटलंय की, 'अॅडमिट कार्ड २४ मार्च २०२१ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी जारी केली जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी यासंबंधीच्या अपडेटसाठी www.nta.ac.in आणि https://ift.tt/34GU9YC या संकेतस्थळांना भेट द्यावी.' उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्टसाठी 'Innovation and Entrepreneurship' हे सेक्शन नव्याने जोडण्यात आलं आहे. या सेक्शनचा पर्याय निवडण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली होती. हे सेक्शन निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्धा तास अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. CMAT 2021 : कसं करायचं डाऊनलोड? - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट cmat.nta.nic.in वर जा. - “Download CMAT 2021 admit card” लिंक वर क्लिक करा. - विचारलेली माहिती भरा आणि सबमीट करा. - अॅडमिट कार्ड आता तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीन वर दिसू लागेल. - आता अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊ ठेवा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vQOkUk
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments