NEET PG 2021: अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विंडो खुली

2021: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) शुक्रवार १९ मार्च पासून नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएशन (NEET PG 2021) साठी अॅप्लिकेशन करेक्शन विंडो उघडत आहे. ज्या उमेदवारांनी यशस्वीपणे अर्ज जमा केले आहेत, ते २१ मार्च पर्यंत करेक्शन विंडोच्या माध्यमातून आपल्या अर्जात बदल करू शकतात. २०२१ संगणक आधारित पद्धतीने १८ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. एनबीईने सांगितलं की 'ज्या उमेदवारांना यशस्वीपणे अर्ज जमा केला आहे, त्यांनी १९ मार्च ते २१ मार्च २०२१ पर्यंत अर्जात दुरुस्ती करायचे आहेत. एडिट विंडोदरम्यान कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.' अॅप्लिकेशन फॉ़र्मची सर्व माहिती एडिट केली जाऊ शकेल. मात्र उमेदवारांचे नाव, ईमेल आयडी, नागरिकत्व आणि परीक्षा केंद्र या माहितीत बदल करता येणार नाही. NEET-PG : अशी करा अर्जात दुरुस्ती - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट nbe.ed.u.in वर जा. - यानंतर होम पेज वर "Applicant Login" वर जा आणि महत्त्वाची माहिती भरा. - आता "Go To Application Form" लिंक वर क्लिक करा. - तुमच्या स्क्रीन वर एक नवं पेज उघडेल, येथे तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म एडिट करू शकाल. - भरलेली सर्व माहिती सबमिट करा आणि अॅप्लिकेशन फॉर्म सबमिट करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r35uKK
via IFTTT

Post a Comment

0 Comments