Also visit www.atgnews.com
NIOS 10th, 12th Result 2021: एनआयओएस बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर
NIOS 10th, 12th Result 2021: राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था (NIOS) बोर्डाचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहोते. यासंबंधी NIOS च्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये सांगितले आहे की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल १५ मार्च २०२१ रोजी जाहीर करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, त्यांनी वर जाऊन आपला निकाल तपासावा. पुढील पद्धतीने निकाल पाहता येईल - माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी results.nios.ac.in या पोर्टलवर लॉग इन करावे. यानंतर होमपेजवर उपलब्ध पब्लिक एक्झामिनेशन लिंकवर क्लिक करावे. आता एक नवे पेज उघडेल. तेथे उमेदवार आपला एनरोलमेंट क्रमांक आणि कॅप्चा आदी माहिती देऊन सबमीट करा. आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. उमेदवार निकाल तपशीलवार पाहावा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट काढून ठेवावे. एनआयओएस बोर्डाच्या उच्च माध्यमिक आणि माध्यमिक परीक्षा २२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cN1o4H
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments