SSC: कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती; दहावी उत्तीर्णांना संधी

Notification: सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या युवकांसाठी एक खुशखबर आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) कॉन्स्टेबल जीडी (जनरल ड्यूटी) भरती २०२१ ची नोंदणी प्रक्रिया गुरुवार, २५ मार्च २०२१ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरतीचे नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. अॅप्लिकेशन फॉर्म, आयोगाच्या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया २५ मार्च, २०२१ पासून सुरू झाली आहे आणि १० मे २०२१ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. एसएससी जीडी कॉन्स्टेबल 2021 नोटिफिकेशन डाऊनलोड करण्याची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे. कोणत्या पदांवर भरती? स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कॉन्स्टेबल (GD) परीक्षेचे आयोजन दरवर्षी केंद्रीय सशस्त्र पोलीस बल (CAPFs), राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA), सचिवालय सुरक्षा बल (SSF) आणि आसाम रायफल्समध्ये राइफलमन (जनरल ड्यूटी) च्या निवडीसाठी केले जाते. निवड प्रक्रिया एसएससी कॉन्स्टेबल जीडी पदांवर नोकरीसाठी उमेदवारांच्या चाचण्या होतात. योग्य उमेदवारांची अंतिम निवड कॉम्प्युटर आधारित टेस्ट (CBT), शारीरिक पात्रता परीक्षा (PET), शारीरिक मानक परीक्षा (PST) आणि वैद्यकीय परीक्षेच्या (Medical exam) माध्यमातून केले जाते. कधी होणार भरती परीक्षा (SSC GD Constable 2021 Exam Date) SSC GD कॉन्स्टेबल 2021 परीक्षा २ से २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केली आहे आणि त्यांचे वय १८ ते २३ वर्षे वयादरम्यान आहे, असे उमेदवार SSC GD पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी एसएससी जीडी कॉन्स्टेबल 2021 अधिसूचना वाचावी. अर्ज शुल्क एसएससी जीडी कॉन्स्टेबल 2021 नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज करता येतील. सर्वसाधारण प्रवर्गांसाठी उमेदवारांचे अर्ज शुल्क १०० रुपये आहे. महिला आणि अन्य आरक्षित प्रवर्गांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OZDR8K
via IFTTT

Post a Comment

0 Comments