SSC स्टेनोग्राफर भरती: अंतिम उत्तरतालिका जारी

2021: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) स्टेनोग्राफर Grade ‘C’ आणि ‘D’ पदांसाठी ऑनलाइन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेसह अंतिम उत्तर तालिका (SSC Final Answer Key) जारी केली आहे. उमेदवार स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन एसएससी स्टेनोग्राफर फायनल आन्सर की तपासू आणि डाऊनलोड करू शकतात. एसएससी स्टेनो भरती (SSC Stenographer Recruitment) 2020 च्या अंतिम उत्तर तालिकेची लिंक २६ मार्च ते २५ एप्रिल २०२१ या कालावधीत अॅक्टिव्ह राहील. आन्सर की आणि प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्याची डायरेक्ट लिंक पुढे देण्यात आली आहे. एसएससी स्टेनोग्राफर Result 2021 द्वारे स्टेनोग्राफर भरती परीक्षा २०१९ चा निकाल १९ मार्च २०२१ रोजी जाहीर झाला होता. यापरीक्षेत एसएससी स्टेनो स्किल टेस्टसाठी एकूण ९,००७ उमेदवार शॉर्टलिस्ट केले आहेत. Stenographer Skill Test Date 2021 आयोगाद्वारे SSC Stenographer भरतीचे नोटिफिकेशन २० सप्टेंबर २०१९ रोजी जारी केले होते. २२ ते २४ डिसेंबर २०२० पर्यंत भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना आता स्किल टेस्ट द्यावी लागेल. स्किल टेस्टची तारीख आयोगाच्या प्रादेशिक वेबसाइट्स वर लवकरच जाहीर केली जाईल. SSC Stenographer 2021 कशी डाऊनलोड कराल? अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा. होम पेज वर ' 'Stenographer Grade ‘C’ & ‘D’ Examination 2019: Uploading of Final Answer Keys along with Question Papers' लिंक वर क्लिक करा. एका नव्या पेज वर पीडीएफ स्वरुपात नोटीस उघडेल. पीडीएफ मध्ये 'स्टेनोग्राफर ग्रेड ’सी’ आणि डी’ परीक्षा 2019 च्या अंतिम उत्तर तालिकेसाठी पुढे लिंक दिली आहे. तेथे क्लिक केल्यावर एक नवे पेज उघडेल. तेथे तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड द्यावा लागेल. SSC स्टेनोग्राफर प्रश्नपत्रिका आणि अंतिम उत्तर तालिका तपासून प्रिंट आऊट घ्यावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wcYyyP
via IFTTT

Post a Comment

0 Comments