Upsc Nda Na Exam 2020: उमेदवारांचे अंतिम गुण जाहीर

Upsc Nda Na Naval Academy marks: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नेव्हल अकॅडमी परीक्षा (NA) २०२० उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे गुण अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहेत. ही परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी झाली होती. ६ मार्च २०२१ रोजी निकाल जाहीर झाला होता. एनडीए आणि नेवल अकादमीचे अंतिम गुण 2020: कसे पाहाल? १) प्रथम अधिकृत वेबसाइट वर जा. २) "Marks of Recommended Candidates: Name of National Defence Academy and Naval Academy Examination (I), 2020" लिंकवर क्लिक करा. ३) गुण पीडीएफ स्वरूपात दिसू लागतील. ४) आपले गुण पाहा आणि डाऊनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा. या परीक्षेद्वारे भारतीय सैन्यदल (Indian Army), वायूदल (Air Force) आणि नौदलात (Indian Navy) भरती केली जाते. दलात दाखल होण्यापूर्वी इंडियन मिलिट्री अकॅडमी (IMA) आणि इंडियन नेवल अकॅडमी (INA) मध्ये प्रशिक्षण दिले जाते. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे गुण एकत्रित करून एकूण ५३३ उमेदवारांची अंतिम यादी यूपीएससीने जाहीर केली होती. ५३३ उमेदवार यशस्वी झाले. यशस्वी उमेदवारांची निवड आवश्यक कागदपत्रांच्या सत्यपडताळणीनंतर अंतिम समजली जाईल. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38ArGWr
via IFTTT

Post a Comment

0 Comments